Friday, October 7, 2016

ऑटोरिक्षा चालक - मालक व नागरिकांना आवाहन


सोलापूर दि. 07: - सध्या शहरातील ऑटो रिक्षा परवाना धारकांना केवळ महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करता येतो.  सोलापूर मनपाच्या कार्यक्षेत्रात  दक्षिण व उत्तर सोलापूर हे दोन तालुके येतात. त्यामुळे या दोन तालुक्यांसह शहरातील ऑटो रिक्षांना परवान्यांना एकत्रित आणण्याचा  विचार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. जेणेकरुन मान्यताप्राप्त परवानाधारक रिक्षांना पुरेसा व्यवसाय मिळेल तसेच नागरिकांनाही चांगली सुविधा मिळेल.
              या सुविधेबाबत ऑटो रिक्षा परवानाधारक रिक्षा युनियन आणि नागरिकांकडून काही सूचना, आक्षेप व हरकती असल्यास संबंधितांनी 20 ऑक्टोबर 2016 पर्यंत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला  कार्यालयीन वेळेत कळवाव्यात, असे आवाहन आर. टी. ओ कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment