Saturday, October 15, 2016

‘ दररोज पुस्तक वाचणार ’






सोलापूर दि. 15 :- दररोज पुस्तक वाचणार, घरातल्या सर्वांना वाचनासाठी उद्युक्त करणार, असा निर्धार आज येथील हरिभाई देवकरण प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केला.
                         माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिना-निमित्त्‍ आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त सामूहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हरिभाई देवकरण प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वाचनाबाबतचा निर्धार केला.
                      सकाळी आठ वाजता प्रशालेच्या प्रांगणात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी वाचनाचे महत्व विषद केले. वाचनामुळे विविध विषयाची माहिती मिळते, असे सांगितले.
                     यावेळी मुख्याध्यापक ए.जी.उंबरजे, निरीक्षक पी.जी.चव्हाण, एस.डी.देशपांडे यांची भाषणे झाली. वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने  डॉ.कलाम यांच्यावरील लेखाचे वाचन केले. सौ.क्षिरसागर आणि  सौ.ढगे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
                                                              0 0 0 0 

No comments:

Post a Comment