Saturday, October 15, 2016

सातारा येथील सैनिकी शाळा प्रवेशाबाबत आवाहन


सोलापूर दि. 15 :- सैनिकी शाळा सातारा या ठिकाणी सन 2017 -18 या सत्राच्या प्रवेशासाठी इयत्ता 6 वी आणि 9 वीच्या प्रवेशासाठी 17 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर 2016 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत प्रशालेच्या  वतीने आवाहन करण्यात आले आहे.
             इयत्ता 6 वीसाठी उमेदवार 2 जुलै 2016 ते 1 जुलै 2007 तर इयत्ता 9 वीसाठी 2 जुलै 2003 ते  1 जुलै 2004 या कालावधीत जन्मलेला असावा. इयत्ता 6 वीसाठी 100 तर इयत्ता 9 वीसाठी केवळ 5 जणांना प्रवेश देण्यात  येईल. मुलींना या शाळेत प्रवेश देण्यात येत नाही.    तसेच यासाठी केवळ इंग्रजी मधून परिक्षा होईल सदरील परिक्षा रविवार दि. 15 जानेवारी 2017 रोजी होणार असून इच्छूकांनी www.sainiksatara.org या संकेतस्थळावर आवश्यक रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढून ऑनलाईन फॉर्म भरावा.  तसेच ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट  त्याचबरोबर सोबतची जोडपत्रे भरुन आपला प्रवेश अर्ज 30 नोव्हेंबर 2016 च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत  सादर करावा,  असे आवाहन सैनिक शाळेच्या प्राचार्यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
00000

No comments:

Post a Comment