Tuesday, October 25, 2016

नोव्हेंबर महिन्यात 5 वी विभागीय महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा परीक्षा


पुणे,  दि. 25 : लेखा कोषागारे संचालनालय, मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणारी 5 वी महाराष्ट्र लेखा स्थानिक लेखा गट- सेवा विभागीय परीक्षा दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर 2016 या कालावधीत होणार आहेपुणे विभागाकरीता परीक्षा नेस वाडीया कॉमर्स कॉलेज 19, लेट प्रिंन व्ही. के. जोग पथ, पुणे-411001 येथे सकाळी 9.30 वाजता होणार असल्याचे सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
          ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केलेला आहेत्यांनी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांचा अर्ज स्विकृत होऊन पात्र झाला असल्यास ओळपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित रहावे, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment