Friday, October 21, 2016

अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे आवाहन


सोलापूर दि21:- अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे सन  2012-13 व 2014-15 या वर्षात विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वितरण केले आहे. या कर्जामध्ये अनियमितता झाली असल्याकारणाने सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरु आहे.
              या चौकशीच्या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना ठरवून दिलेली रक्क्म कर्ज रुपाने मिळाली नसल्यास किंवा कर्ज वितरणाबाबत काही तक्रार असल्यास संबंधितांनी 022-22672585,27571485 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा  hccidcrimekb@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. संबंधित लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत, तहसिल आणि पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आली असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी  पत्रकान्वये दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment