Friday, October 7, 2016

द्रुतगती महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आदेश



      पुणे, दि.7 : द्रुतगती मार्गावरील कि.मी. 40 ते कि.मी. 48 या दरम्यान (घाट सेक्शन) झालेल्या वाहतूक कोंडीसंदर्भात केलेल्या सखोल विश्लेषणानंतरअप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), पुणे यांनी तीन ॲक्सल, मल्टी ॲक्सल व ओडीसी वाहनांच्या अपघातामुळे किंवा नादुरुस्त  होण्यामुळे वांरवार वाहतुक कोंडी होऊन हलक्या वाहनातील प्रवाशांना सुट्ट्यांचा दिवशी प्रवास करताना वाहतुक  कोंडीचा सामना करावा लागतो यासाठी आदेश निर्गमित केले आहेत. मोटर वाहन कायद्यातील अनुक्रमांक 1 च्या तरतुदीनुसार अधिसुचना जारी करण्यात आली आहे. शासन अधिसुचना क्र. एम.व्ही.0589 /सीआर, 19 मे, 1990 Amendment 30 सप्टेंबर, 2002 नुसार मोटर वाहन कायदा 1988 व कलम 115 अन्वेय प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन तीन ॲक्सल, मल्टी ॲक्सल, ओडीसी वाहने यांना खालीलप्रमाणे निर्बध लागू केले आहे.
या अधिसुचनेनुसार मुंबईपुणे यादम्यानची वाहतुक सुट्टीच्या दिवशी, गर्दीच्यावेळी वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबईपुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोल प्लाझा या दरम्यान तीन ॲक्सल, मल्टी ॲक्सल व ओडीसी  वाहनांना खालील नमुद वेळी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
     शुक्रवारी संध्याकाळी किंवा दोन पेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशी  संध्याकाळी  5- 00ते 8-00 वाजेपर्यत.
    शनिवारी  सकाळी  किंवा दोन पेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशी  सकाळी  8- 00 ते 12-00 वाजता. खालापुर  टोल नाका द्रुतगती  मार्गावर  एमएच-04 ला जोडणारा मार्ग
    रविवार संध्याकाळी किंवा दोन पेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशी  संध्याकाळी 4- 00 ते 8-00 वाजता.
सोमवारी  सकाळी  किंवा दोन पेक्षा अधिक सुट्ट्या सुरु होण्याच्या आदल्या दिवशी  सकाळी  6- 00 ते 9-00 वाजता. कुसगांव येथे एम एच 04 वर उर्से येथे द्रुतगती मार्गावर  डाव्या बाजुला

000000

No comments:

Post a Comment