Thursday, October 6, 2016

संशोधक व्हा ! - देवेंद्रभुजबळ

*विशेष लेख

देशातील शास्त्रीयव तांत्रिक संशोधनाला चालना मिळावी या हेतुने संसदेत विशेष कायदा संमत करुन 2011 साली 'ॲकॅडमी ऑफ सायंटिफिक ॲण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च' या संस्थेची स्थापना करण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे संशोधन व्हावे, मार्गदर्शन व्हावे, भावी शास्त्रज्ञ घडावे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या संस्थेच्या वतीने विविध विषयातील पूर्ण वेळ, प्रायोजित, थेट स्वरुपाचे पीएचडी अभ्यासक्रम आयोजित करण्यात येतात. संस्थेने नुकतीच बायोलॉजीकल सायन्सेस्, केमिकल सायन्सेस्, फिजिकल सायन्सेस्,मॅथेमॅटिकल अॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्सेस आणि इंजिनियरिंग मधील पीएचडी अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागविले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांची कलचाचणी आणि मुलाखतीच्या आधारे निवड होईल. केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या धोरणानुसार विविध संवर्गासाठी जागा आरक्षित आहेत.
या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक पात्रता आणि अन्य तपशिल यासाठी कृपया संस्थेच्याhttp://acsir.res.inया संकेतस्थळास भेट द्यावी.
या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर, 2016 अशी आहे.
----xxx----

No comments:

Post a Comment