Friday, October 14, 2016

जिल्ह्यात 15 हजार 114 हेक्टरवर रब्बीची पेरणी


 सोलापूर दि. 14 :  जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या असून सुमारे 15 हजार 114 हेक्टरवर रब्बी पिकाची  (ऊस वगळून) पेरणी झाली आहे. यामध्ये  रब्बी ज्वारी 12 हजार 198 हेक्टर, मका  2 हजार 916 हेक्टरवर पेरणी झाली आहे. 
रब्बी पेरणी झालेल्या क्षेत्रात पंढरपूर तालुक्यात 2 हजार 414 हेक्टर तर मंगळवेढा तालुक्यात           12 हजार 700 हेक्टरवर पेरणी झाली आहे.  तर जिल्ह्यात 6 हजार 371 हेक्टरवर ऊसाची लागण झाली असल्याची माहिती अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली.
00000

No comments:

Post a Comment