Saturday, October 29, 2016

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती


पुणे, दि. 24 : राज्यातील इयत्ता 9 वी व 10वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जतीच्या विद्यार्थ्याना व विद्यार्थीनींना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागु करण्यात ली आहे.
            या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती व इतर अनुदानाचे दर पुढील प्रमाणे आहेत. वसतिगृहात न राहणाऱ्या अनिवासी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती रु.150, पुस्तके व तदर्थ वार्षिक अनुदान रु.750 आहे. वसतिगृहात राहणाऱ्या निवासी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती रु.350  पुस्तके व तदर्थ वार्षिक अनुदान रु.750 आहे.
    या शिष्यवृत्तीशिवाय विनाअनुदानित शाळेतील अपंग विद्यार्थी / विद्यार्थीनिकरीता अतिरिक्त भत्ते पुढील प्रमाणे आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी मासिक भत्ता, वसतिगृहात न राहणाऱ्या अपंग  विद्यार्थ्यांकरीता वाहतुक भत्ता,  अपंग  विद्यार्थींच्या सोबत्याकरीता भत्ता, अपंग विद्यार्थ्यांच्या मदतनीसाकरीता भत्ता प्रत्येकी 160 रुपये, मंदबुध्दी  विद्यार्थींकरीता शिकवणी भत्ता 240 रुपये आहे.
            योजना ऑनलाईन असल्याने http://mahaescholmaharashtra.gov.in या पोर्टलवरुन विद्यार्थ्यांनी अर्ज भरावयाचे आहेत. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ऑनलाईन भरण्यात आलेल्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रत (फ्रेश/ रिनिवल) , सक्षम प्राधिकाऱ्याचा विद्यार्थी / विद्यार्थ्यांनीचा जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दोन लाखाच्या आत उत्पन्न्असल्यास पालक नोकरी असतील र त्यांनी वार्षिक उत्पन्ना बाबत नियोक्त्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी वरील योजनेच्याबाबतीत अधिक माहितीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांच्याशी संपर्क साधावा.
000



No comments:

Post a Comment