Monday, October 24, 2016

७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र लेखा सेवा परीक्षा



पुणे. दि. 24 (विमाका): - लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणारी ५ वी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा गट क सेवा विभागीय परीक्षा दिनांक ७ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१६ या कालावधीमध्ये होणार आहे. पुणे विभागाकरीता परीक्षेचे ठिकाण नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, १९ लेट प्रिन्सिपल व्ही.के. जोग पथ, पुणे-०१ आहे. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व त्यांचा अर्ज स्वीकृत होऊन पात्र झाला असल्यास ओळखपत्रासह परीक्षेसाठी सकाळी ९.३० वाजता वरील ठिकाणी उपस्थित रहावे, असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग पुणे या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
****


No comments:

Post a Comment