Thursday, October 20, 2016

उद्योगाच्या विकासाबाबत अर्ज करण्याचे आवाहन


सोलापूर दि. 20: - जिल्ह्यातील उद्योगांच्या वाढीसाठी व विकासाकरिताची प्रक्रिया अधिक वेगाने व सुलभ व्हावी, या उद्देशाने औद्योगिक विकासाकरिता, औद्योगिक अकृषिक वापर सहाय्यभुत समिती गठीत करण्यात आली आहे.
   या समितीची बैठक येत्या 24 ऑक्टोबर रोजी दु. 12 वा. जिल्हाधिकारी रणजितकुमार  यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.
  जिल्ह्यातील उद्योगांबाबत विलंब टळावा या उद्देशाच्या अनुषंगाने संबंधितांनी विहीत नमुना व आवश्यक कागदपत्र व अर्जासह निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या नावे सेतु कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर या ठिकाणी 24 ऑक्टोबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महसूल (तहसिल) कार्यालय सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment