Monday, October 24, 2016

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी



पुणे दि.२४ : पोलीस अधिक्षक,महामार्ग परीक्षेत्र, ठाणे व पुणे यांनी सादर केलेल्या अहवालाच्याआधारे व यापुर्वी द्रुतगती  मार्गावरील कि.मी क्र. ४०-०० ते ४८-०० या दरम्यान (घाट सेक्शन) झालेल्या वाहतुक कोंडीसंदर्भात केलेल्या सखेाल विश्लेषणानंतर आर.के पद्मनाभन, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी त्यांना मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन द्रुतगती मार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी तीन ॲक्सल,मल्टी ॲक्सल व ओडीसी या वाहनांना येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्बधाबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
            शुक्रवारी संध्याकाळी किंवा दोन व दोनपेक्षा अधीक सुट्टया सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी मुंबईपुणे या दरम्यान 18-00 ते 21-00 वाजेपर्यत तीन ॲक्सल,मल्टी ॲक्सल व ओडीसी या वाहनांना द्रुतगती मार्गावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
            शनिवारी सकाळी किंवा दोन व दोनपेक्षा अधीक सुट्टया सुरु होण्याच्या दिवशी सकाळी मुंबईपुणे या दरम्यान 08-00 ते 12-00 वाजेपर्यत तीन ॲक्सल,मल्टी ॲक्सल व ओडीसी या वाहनांना द्रुतगती मार्गावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
            रविवारी सकाळी किंवा सुट्टया समाप्तीच्या शेवटच्या दिवशीच्या संध्याकाळी पुणेमुंबई या दरम्यान 17-00 ते 20-00 वाजेपर्यत तीन ॲक्सल,मल्टी ॲक्सल व ओडीसी या वाहनांना द्रुतगती मार्गावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
            सोमवारी सकाळी किंवा सुट्टयानंतरच्या पहिल्या कार्यालयीन दिनाच्या सकाळी पुणेमुंबई या दरम्यान 06-30 ते 09-30 वाजेपर्यत तीन ॲक्सल,मल्टी ॲक्सल व ओडीसी या वाहनांना द्रुतगती मार्गावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
000


No comments:

Post a Comment