Monday, October 24, 2016

नगर परिषद निवडणूक कालावधीत शस्त्र बाळगणेस मनाई



पुणे, दि. 24 : महाराष्ट्र राज्यातील  डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत मुदती संपणा-या 195 व नवनिर्मित नगर परिषदानगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयातील बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नरसासवड व शिरुर असे एकूण 10 नगरपरिषदेचा समावेश आहे.
त्याबाबतची आचार संहिता दि. 17.10.2016 चे रात्री 12.00 वाजलेपासून संपुर्ण पुणे जिल्हयात  अमलात आलेली आहे. पुणेजिल्हयातील नगरपरिषदेची / नगरपालिकेची निवडणूक  शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे / दारुगोळा यांचा गैरवापार होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जिवीत हानी किंवा  सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये. सार्वजनिक शांतत बिघडवून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये  शस्त्रांचा / हत्यारांचा / दारुगोळयांचा गैरवापार होण्याची दाट शक्यता असल्याने परवान्यावरील शस्त्रे / अग्नीशस्त्रे जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेणेस प्रतिबंध करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.
            त्याअर्थी मी, राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (अे) (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्हयात सदर आदेशाच्या दिनांकापासून ते निवडणुकींचा निकाल जाहिर होईपर्यंत म्हणजेच दिनांक 15.12.2016 अखेरपर्यंत स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे / हत्यारे दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई करीत आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारीकर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षीततेतासाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात येत आहे. बँक अथवा  सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापार होणार नाही, याची दक्षता घेणेची जबाबदारी संबधित बँकेची / संस्थांची / अधिका-यांचे वर राहील.
सदरचा आदेश दिनांकब 15.12.2016 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा. दं. संहिता कलम 188 मधील तरतुदीनुसार कारवाईस प्राप्त राहील. असेही सदर आदेशात म्हणले आहे.

                                                            000000

No comments:

Post a Comment