Tuesday, October 1, 2019

यंदाची निवडणूक पर्यावरण स्नेही निवडणूक - डॉ. दीपक म्हैसेकर




पुणे दि. 1: यंदाची निवडणूक पर्यावरण स्नेही निवडणूक म्हणून केंद्रीय आयोगाने जाहीर केली असून त्यामुळेच प्लॅस्टिकचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये असे आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केले.
पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या राज्यभरातील अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीच्या प्रधान महानिदेशक इरा जोशी होत्या.
 डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्यानं आदर्श आचारसंहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली. अस्तित्वात असलेल्या कायद्याचे तंतोतंत पालन म्हणजेच आदर्श आचारसंहिता असल्याचे सांगत ते पुढे म्‍हणाले, निष्पक्षपाती म्‍हणजे कोणत्‍याही पक्षाला अधिकचा फायदा न मिळता सर्वांना समान संधी. निवडणूक आचारसंहि‍ता काळात राजकीय पक्ष, प्रसारमाध्‍यम अशा सर्वांवरच बंधने असतात. कोणालाही अवाजवी स्‍वातंत्र्य मि‍ळू नये, अशीच या मागची स्‍वच्‍छ भूमिका असते. आचारसंहितेच्‍या अंमलबजावणीचे काही टप्‍प्‍ो असतात. त्‍यानुसार त्‍याची अंमलबजावणी केली जाते आणि या आचारसंहितेंचा भंग करणाऱ्या वि‍रूध्द आवश्‍यक त्‍या कायद्यानुसार गुन्‍हेही दाखल केले जातात. 
निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरानीं निःपक्षपातीपणे वार्तांकन करावे अशी अपेक्षा इरा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी पुणे आकाशवाणी केंद्राचे उपमहानिर्देशक आशिष भटनागर, उप निर्देशक गोपाल आवटी आणि वृत्त विभागाचे प्रमुख नितीन केळकर यांनीही मार्गदर्शन केले. 
या कार्यशाळेला राज्यभरातील आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****







No comments:

Post a Comment