Thursday, April 6, 2017

शेतकऱ्यांना ३१ मे पूर्वी पीक कर्जांचे वाटप करावे - किशोर तिवारी




पुणे दि. ६:  शेतकऱ्यांसमोरील संकट कमी करण्यासाठी सर्व बँकांनी ३१ मे पूर्वीपर्यंत पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या.
            येथील सहकार आयुक्त कार्यालयातील सभागृहात पीक कर्ज आढावा बैठक किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अप्पर आयुक्त डॉ. आनंद जोगदंड, विभागीय लेखा परिक्षक राजेश जाधव, पणनचे विभागीय संचालक यशवंत गिरी, उपनिबंधक (अर्थडी. एस. साळुंखे उपस्थित होते.
            किशोर तिवारी म्हणाले, दुष्काळ, नापिकी, मुलांचे शिक्षण, आरोग्यासह इतर खर्चांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योगांकडे वळवून शेतीवरील भार कमी करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगाम चांगला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप ३१ मे पूर्वी करावे. तसे बँकांना निर्देश देवून त्यांना पतपुरवठा करण्याच्या सूचना श्री. तिवारी यांनी केल्या.
            या बैठकीत पीक कर्जासह खरीप हंगामासह इतरविषयांचा आढावा घेण्यात आला.
******

No comments:

Post a Comment