Monday, February 20, 2017

दौंडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून 12 व्यक्तींविरोधात कलम 144 (3 ) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी


पुणे,दि. 20-  पुणे जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पार पडणाऱ्या पंचायत  समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका सुव्यस्थीत  पार पाडण्याच्या  दृष्टिकोनातून  दौंडचे उपविभागीय दंडाधिकारी संजय असवले यांनी विविध गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तींना 24 तारेखपर्यंत   फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144(3) नुसार दौंड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
            या  प्रतिबंधात्मक आदेशान्वये अविनाश उर्फ  रांगड्या भानुदास दिवेकर, विकास बाळासो  दिवेकर, गोपीनाथ मच्छिंद्र दिवेकर,दिपक गोरख दिवेकर, गणेश केशव दिवेकर, दिपक रामचंद्र दिवेकर, अक्षय अर्जुन दिवेकर, मंगेश कांतीलाल दिवेकर, वैभव राजेंद्र दिवेकर, अभिजीत पाटीलबुवा दिवेकर, तुषार दिपक दिवेकर,मंगेश विनायक दिवेकर, सर्व राहणार वरवंड, ता. दौंड, यांच्यावर यवत पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम 143,147,148,149,452,337,323,504  आणि 506 अन्वये गुन्हे दाखल असल्याने त्यांना 24 फेब्रुवारी  रात्री 12 वाजेपर्यंत दौंड तालुक्याच्या हद्दीत प्रवेशास वास्तव्यास मनाई केली आहे.
            तथापि, या व्यक्तींना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30  वाजल्यापासून  सायं 5.30 वाजेपर्यंत मतदानासाठी सवलत देण्यात  आली आहे. मात्र त्यांनी मतदानासाठी हद्दीत प्रवेश केल्याबद्दल यवत पोलीस ठाण्यास लेखी सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
            या आदेशाचा अवमान करणारी व्यक्ती  भारतीय दंडविधान कलम 188 अन्वये कारवाईस  पात्र  राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले  आहे.
0000



No comments:

Post a Comment