Friday, June 29, 2018

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 3781 जादा बसेस उपलब्ध करुन देणार


                                                                     
                   परतीच्या प्रवासासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी
                                                                              परिवहनमंत्री-दिवाकर रावते





     पंढरपूर दि. 29 :   आषाढी यात्रे निमित्त  श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. यात्रेसाठी येणा-या भाविकांना सुरक्षित  व सुखकर प्रवासाठी  राज्य परिवहन महामंळामार्फत 3 हजार 781 जादा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार  आहे. तसेच परतीच्या प्रवासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी  उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांनी दिली.
            आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे  राज्य परिवहन महामंडळामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाअधिकारी रामचंद्र शिंदे, एस.टी प्रांतधिकारी सचिन ढोले. सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती, तहसिलदार मधुसूदन बर्गे, एस.टी.महामंडळाचे महाव्यवस्थापक आर.आर.पाटील, महाव्यवस्थापक यांत्रिकी श्री. पावणीकर, उपमहाव्यस्थापक वाहुकचे श्री.तोरो,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे,श्रीमती अर्चना गायकवाड, श्री.आजरे,  विभाग नियंत्रक-रमाकांत गायकवाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी  परिवहन मंत्री दिवाकर रावते बोलताना म्हणाले,  आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे राज्यातील विविध भागातून मोठ्या प्रमाणत भाविक येत असतात. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी 21  ते 28 जुलै या कालावधीत महामंडळाचे सुमारे 8 हजार कर्मचारी सेवा देणार  असून, या      कर्मचा-यांना  वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्याच्या सोयीसाठी तीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती  करण्यात येत आहे. या  बसस्थाकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी,  फिरती स्वच्छतागृहे, उपहारगृहे, रुग्णवाहिका, विभागनिहाय चौकशी कक्ष तसेच संगणकीय उदघोषणा आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.
           




   आषाढी यात्रेच्या दिवशी चंद्रभागा बसस्थानकावरुन गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी पोलीस विभागाने एस.टी बसेससाठी राखीव वेळ ठेवावी. जेणेकरुन वाहतुक कोंडी होणार नाही. त्यामुळे भाविकांना  इच्छितस्थळी पोहचता येईल अशा सुचना परिवहन मंत्री श्री.रावते यांनी याबैठकीत दिल्या. तसेच  भंडीशेगांव येथील बाजीराव विहिर येथे शनिवार  दिनांक 21 जुलै  रोजी होणा-या रिंगण सोहळ्याला जाण्यासाठी व येण्यासाठी  चंद्रभागा बसस्थानक  येथून 100 जादा बसेसची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार  आहे. तसेच यात्रेनंतर परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी  असते.  भाविकांना परतीच्या प्रवासासाठी 10 टक्के बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन आरक्षण करावे. तसेच   पंढरपूर येथील मठ, यात्री निवास, धर्मशाळा  आदी ठिकाणी  वारकरी व भाविक मुक्कामासाठी थांबले आहेत अशा ठिकाणी  महामंडळाचे कर्मचारी जाऊन प्रवाशांच्या मागणी नुसार आगाऊ आरक्षण करुन देण्यात येणार असून, या सुविधेचा भाविकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन परिवनमंत्री दिवाकर रावते यांनी  केले.
                        तत्पुर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी  प्रवाशांच्यासोयीसाठी तात्पुरत्या उभारण्यात येणा-या भिमा बसस्थानक, चंद्रभागा बसस्थानक तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील बसस्थानकांची पाहणी केली. तसेच संबधीत अधिका-यांनकडून माहिती घेवून आवश्यकत्या सुचना केल्या. तसेच रिवहन श्री रावते यांनी  श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदीर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नविन  एस.टी.बसस्थानकाची पाहणी करुन  स्थाकावर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन पानसर तयार करण्याच्या सुचना संबधित अधिका-यांना दिल्या.          
00000

No comments:

Post a Comment