Friday, June 22, 2018

उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांकडून घेतली नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती


                 उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांकडून
                     घेतली नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती

बारामती  दिनांक 22-उपराष्‍ट्रपती  व्‍यंकय्या नायडू यांनी आज बारामती येथील शारदानगर शैक्षणिक  संकुलातील विद्यार्थ्‍यांनी केलेल्‍या नावीन्‍यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन आनंद व्‍यक्‍त केला.
                            नीती आयोगाकडून शेतीशी निगडीत उद्योग उभारणीसाठी कृषि महाविद्यालयास मंजूर झालेल्‍या भारतातील दुस-या व महाराष्‍ट्रातील पहिल्‍या अटल इन्‍क्‍युबेशन सेंटर आणि अटल टिंकरिंग लॅबच्‍या विद्यार्थ्‍यांशी उपराष्‍ट्रपती  श्री. नायडू यांनी संवाद साधला. संस्‍थेच्‍या दहावीच्‍या विद्यार्थ्‍यांनी तयार केलेल्‍या विविध उपकरणांची माहिती त्‍यांनी जाणून घेतली. टाकाऊतून खेळणी, पवनचक्‍की, अविष्‍कार स्‍वच्‍छता यंत्र, चरख्‍यातून वीजनिर्मिती, ऑब्‍स्‍टॅकल अॅव्‍हॉयडर, ऑटोमॅटीक रेन अलार्म सिस्‍टीम, थ्रीडी प्रिंटर, गॅस सुरक्षा यंत्र, कम्‍युनिकेशन ऑफ डिव्‍हाईसेस युझींग वायफाय, टच सेन्‍सर अशा विविध उपकरणांची उपराष्‍ट्रपतींनी पहाणी केली. याशिवाय  नेदरलँड एज्‍युकेशन प्रोग्राम, सीबीई बेस्‍ड एज्‍युकेशनल थिम्‍सची माहिती घेतली.  अॅग्रीकल्‍चरल डेव्‍हलपमेंट ट्रस्‍ट,  बारामती कृषी महाविद्यालयाच्‍या तसेच शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी जमीनीचा पोत सुधारण्‍यासाठी  तसेच पीक उत्‍पादकता वाढीसाठी तयार केलेल्‍या उत्‍पादनांची माहितीही उपराष्‍ट्रपतींनी घेतली.
                           यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अजित पवार, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष विश्‍वासराव देवकाते, सुनंदा पवार, शुभांगी पवार, रोहित पवार, रणजीत पवार, राजेंद्र पवार, नीलेश नलावडे, डॉ. एस.पी. महामुनी, प्रा. संतोष कर्णेवार, प्रा. सोनाली सस्‍ते, तेजश्री गोरे, सुनील पवळ,  सूर्यकांत मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                            विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्‍ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामतीचे  उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपविभागीय अधिकारी संजय अस्‍वले, बारामतीचे तहसिलदार हनुमंत पाटील,  हेही यावेळी उपस्थित होते.
0 00 0




No comments:

Post a Comment