Tuesday, December 6, 2016

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी इंदू मिलमधील स्मारकाचे काम लवकर पूर्ण करणार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली


मुंबईदि. ६ समताधिष्ठित भारत घडविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार अतिशय महत्त्वपूर्णमार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर त्यांच्या पुतळ्यास आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी त्रिशरण पंचशील’ म्हणण्यात आले.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस पोलीस पथकाद्वारे शासकीय मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमास शिक्षणमंत्री विनोद तावडेग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेसामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोलेराज्यमंत्री दिलीप कांबळेमहापौर स्नेहल आंबेकरउपमहापौर अलका केरकरराज्यसभा सदस्य डॉ. नरेंद्र जाधवआमदार भाई गिरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले कीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपल्याला सर्वांना एक दिशा मिळाली आहे. त्या संविधानाचे अनुकरण आपण सर्वंजण करतो आहे. स्वातंत्र्यसमताबंधुता या मार्गांचे पालन करुन आपण पुढे जात आहोत. डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलात्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेला 'प्रॉब्लेम ऑफ रुपीहा ग्रंथ जरी 1923 मध्ये लिहिला असला तरी तो आजच्या काळात निश्चितच उपयोगी पडणारा आणि आजच्या घडीशी सुसंगत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र जाधव यांनी इंग्रजी अनुवाद केलेल्या 'युगप्रवर्तक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विविध पैलू विषयी माहिती देणारे कॉफी टेबल बुक छायाचित्र प्रदर्शनाला यावेळी श्री. फडणवीस आणि उपस्थित सर्वांनी भेट दिली.
00000

Saturday, December 3, 2016

अल्पसंख्यांक विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर


सोलापूर दि.03 : - अल्पसंख्यांकाच्या कल्याणाकरिता पंतप्रधानांनी नवीन 15 कलमी कार्यक्रम आखला आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी त्यांना देण्यात आलेली जबाबदारी गांभीर्यपुर्वक पार पाडावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिले.
                        सेतू सभागृहात जिल्हा अल्पसंख्यांक विकास संनियंत्रक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. 
                      अल्पसंख्यांक समुदायासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबविते परंतु त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी  न झाल्याने त्या योजना संबंधित लोकांपर्यंत पोहचत नसल्याचे सांगून श्री. रेळेकर म्हणाले, संबंधित विभागांनी याबाबात सूक्ष्म नियोजन करावे तसेच त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द रहावे. श्री . रेळेकर यांनी अल्पसंख्यांक समुदायासाठी असलेल्या योजना , फंड शालेय उपस्थिती , स्वयंरोजगार बँकेतर्फे देण्यात येणा-या लाभाचा तसेच पोलीस विभागातर्फे  अल्पसंख्यांक समुदायासाठी करण्यात येणा-या प्रयत्नांचा आढावा यावेळी घेतला.
                        या बैठकीसाठी अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, शिक्षणाधिकारी तानाजी घाटगे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की , जिल्हा महिला बाल कल्याण विकास अधिकारी धर्मपाल साहू, नगर अभियंता (म.न.पा.) लक्ष्मण चलवादी, मनपा  शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती सुधा साळुंखे , यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित हाते .
000000

दिव्यांगांना आर्थिक मदतीसाठी विविध योजनांद्वारे प्रयत्न - पालकमंत्री विजय देशमुख यांचे प्रतिपादन


सोलापूर दि.03 : - दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी राज्य शासन अनेक स्तरावरुन प्रयत्न करीत आहे. जिल्हयातील दिव्यांगांना विविध आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पण लाभार्थ्यांनी कर्जाची परतफेडही करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज येथे केले.
                        जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना कर्ज वाटप आणि नियमित कर्ज परतफेड करणा-या लाभार्थींचा सत्कार पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सात रस्ता येथील सामाजिक न्याय भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त् नागनाथ चौगुले, अपंग वित्त विकास महामंडळाचे कमलेश माने उपस्थित होते.
                       पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. त्यासाठी आवश्यक असणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन घेतला जाईल. 
                      सामाजिक न्याय विभागाच्या अख्यत्यारितील सर्वच आर्थिक महामंडळानी आपल्या योजनांची प्रभावी प्रसिध्दी करावी आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना काम मिळेल, यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचनाही पालकमंत्री विजय देशमुख यांनी केल्या.
                     यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई बंगनोळे,भाऊसाहेब आरणे, नागनाथ आदलिगे,धनाजी चोपडे, नितीन माने, खाजा जमादार, विनोद देशमुख यांना कर्जाचे धनादेश वितरण करण्यातआले.त्याचबरोबर कर्जाची वेळेत परतफेड करणा-या लाभार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
                      यावेळी महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उत्तम मोहिते, संत रोहिदास वित्त्‍ विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दयानंद खोत, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षिरसागर, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पोपट झोंबाडे उपस्थित होते.

                                                                0 0 0 0

Thursday, December 1, 2016

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार




        पंढरपूर, दि. 1  : अमर रहे... अमर रहे, शहिद कुणाल गोसावी अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम  अशा घोषणा  आणि  आश्रुनी भारलेल्या नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहिद मेजर कुणाल गोसावी  यांच्यावर वाखरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
            यावेळी मेजर शहिद कुणाल गोसावी यांच्या पार्थिवास राज्य शासनाच्या वतीने  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिलीयावेळी  जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार भारत भालके, बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक, दत्तात्रय सावंत, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, वाखरी गावच्या सरपंच मथुराबाई मदने, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
            दुपारी साडेतीनच्या सुमारास अंत्ययात्रा वाखरी येथे आली. त्यानंतर पोलीस व लष्करी जवानांनी शहिद मेजर कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी उपस्थित जवान, तसेच जनसमुदायाच्या शोकभावना अनावर झाल्या. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज शहिद जवान कुणाल गोसावी यांच्या आई वृंदा गोसावी यांच्याकडे लष्कराच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.
            लष्कराच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शहिद कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना दिली. पोलीसांच्यावतीनेही  शहिद कुणाल गोसावी यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.  वडील मुन्नागीर आणि मेजर कुणाल यांची कन्या उमंग यांनी अग्नी दिला. यावेळी अवघा परिसर शोकाकुल झाला होता.  अमर रहे... अमर रहे शहिद कुणाल गोसावी अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम  अशा  घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी  लष्कराचे  ब्रिगेडिअर बोधे, कर्नल टिंग्रे, कर्नल अमित त्रिपाठी, कर्नल यादव, मेजर नंदी, मेजर अंकुर अगरवाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले उपस्थित होते.
            तत्पूर्वी, सकाळी 10च्या सुमारास शहिद कुणाल गोसावी यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पुणे  येथून पंढरपूर  येथे  खास हेलीकॉप्टरमधून आणण्यात आले.  त्यानंतर त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले.  तेथे त्यांच्या  सर्व कुटुंबियांनी साश्रुनयनांनी अंत्यदर्शन घेतले. आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार नागेश पाटील  यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांनी पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.
            त्यानंतर शहिद मेजर कुणाल गोसावी यांची अंत्ययात्रा पंढरपूर शहरातून काढण्यात आली. ही अंत्ययात्रा नाथ चौक, प्रदक्षिणा मार्ग, चौफाळा, शिवाजी चौक, सावरकर चौक, एस. टी. स्टॅण्ड येथून वाखरी पर्यंत नेण्यात आली.  यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने जमलेल्या लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली.
            शहिद कुणाल गोसावी यांचे पार्थिव येण्याची वाट आज सकाळपासूनच अवघे पंढरीवासीय पाहत होते. पंढरपुरातील सर्व व्यवहार आज बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शहराच्या प्रत्येक चौकात शहिद मेजर कुणाल गोसावी यांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते. दाळे गल्लीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी अवघे पंढरपूर व परिसरातील नागरिक लोटले होते. यामध्ये महिला, तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची लक्षणीय उपस्थिती होती.

000000

शहीद जवान मेजर कुणाल गोसावी यांना पुणे विमानतळावर आदरांजली





पुणे दि. 1 (विमाका): जम्मू शहरानजीक नागरोटा येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव सकाळी विमानतळावर आले. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
त्यांनतर मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पंढरपूरला रवाना करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाच्यावतीने हवेलीच्या प्रांत ज्योती कदम, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, तहसीलदार दशरथ काळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच संरक्षण विभाग, सैनिक कल्याण विभाग आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद जवान गोसावी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
****


ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रम

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)


            मुंबई, दि. 1 : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असून ग्रामविकासासाठी काम करण्याची इच्छा असलेल्याप्रतिभावान युवकांचा या कार्यात सहभाग घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशि कार्यक्रम-2016’ हाती घेतलाआहे.
            शाश्वत विकासासाठी गावांना सक्षम करतानाच त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून फेलोंना मिळणार आहे. त्यासाठी त्यांना आपल्या ज्ञानाचा  कौशल्याचा पुरेपूर उपयोग करता येणार आहे. मान्यताप्राप्त संस्था  विद्यापीठांमधून  कोणत्याही शाखेची पदवी घेतलेल्या २० ते ३० वर्षेवयोगटातील युवकांना  जानेवारी २०१७ पर्यंत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करता येईलएक वर्षासाठी असणाऱ्या या फेलोशि कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारास ३० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे मानधन (विद्यावेतनमिळेल. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती  सहभागासाठी खालील संकेतस्थळाला भेट देता येईल. https://www.maharashtra.gov.in/cmrdfp2016/missionm.html
            महाराष्ट्रातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी ''ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन'' हा प्रकल्प हाती घेतला आहेशासनाच्या ग्रामीण विकास प्रकल्पांमधील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या प्रकल्पातून एक हजार गावांना आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेमहाराष्ट्र शासन व भारतातील प्रमुख कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहेग्रामीण भागांमध्ये सर्वोत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणे व गावांमधील अंतिम व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवून गावांना शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहेग्रामीण महाराष्ट्रासह भारतात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये असून त्याचे अनुकरण देशाच्या अन्य भागांमध्ये देखील केले जाऊ शकते.
------०००------

Wednesday, November 30, 2016

अनाधिकृत धार्मिक स्थळाबाबत आढावा बैठक संपन्न



     सोलापूर दि. 30: अनाधिकृत धार्मिक स्थळाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासनाच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी म्हणाले, अनाधिकृत धार्मिक स्थळे निष्काशित करण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात असणा-या अनाधिकृत धार्मिक स्थळाचे विहित मुदतीत निष्काशन करावे. जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रातील बार्शी- 121, सांगोला 91, करमाळा 61, कुर्डूवाडी 24, अक्कलकोट 70, दुधणी 4 आणि पंढरपूर 253 तर ग्रामीण भागात बार्शी तालुक्यात 1, माढा 1, मोहोळ 7, सांगोला 163 आणि माळशिरस तालुक्यातील 64 धार्मिक स्थळाबाबत तपासणी करुन नियमानुसार कारवाई करावी. याबाबत केysलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.बैठकीस नगरपालिकेचे मुख्यधिकारी व संबंधित तालुक्याचे तहसिलदार उपस्थित होते.
00000