Wednesday, November 30, 2016

अनाधिकृत धार्मिक स्थळाबाबत आढावा बैठक संपन्न



     सोलापूर दि. 30: अनाधिकृत धार्मिक स्थळाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासनाच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी म्हणाले, अनाधिकृत धार्मिक स्थळे निष्काशित करण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात असणा-या अनाधिकृत धार्मिक स्थळाचे विहित मुदतीत निष्काशन करावे. जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रातील बार्शी- 121, सांगोला 91, करमाळा 61, कुर्डूवाडी 24, अक्कलकोट 70, दुधणी 4 आणि पंढरपूर 253 तर ग्रामीण भागात बार्शी तालुक्यात 1, माढा 1, मोहोळ 7, सांगोला 163 आणि माळशिरस तालुक्यातील 64 धार्मिक स्थळाबाबत तपासणी करुन नियमानुसार कारवाई करावी. याबाबत केysलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.बैठकीस नगरपालिकेचे मुख्यधिकारी व संबंधित तालुक्याचे तहसिलदार उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment