Tuesday, November 29, 2016

पालखीमार्ग संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न



सोलापूर दि. 29 :  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पंढरपूर आणि परिसरात विकसित करण्यात येणाऱ्या पालखी मार्गाच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी संजय तेली, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
            राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पालखी मार्ग विकसित करण्यात येत असून पंढरपूर, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूर ठिकाणी बायपास करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी बैठकीत दिल्या. पालखीच्यावेळी  पंढरपूर येथील कॉलेज चौक, सरगम चौक आणि तीन रस्ता या ठिकाणी  ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. यातून मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी आवश्यक ती उपाय योजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
            पंढरपूर येथील 65 एकरात ज्या प्रमाणे पिण्याच्या पाणी व्यवस्था करण्यात  आली आहे त्याच प्रमाणे पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी कायमस्वरुपी पाण्याची टाकी उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात येऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. 
000000


No comments:

Post a Comment