Tuesday, November 8, 2016

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृती परिक्षेची अधिसूचना प्रसिध्द झाल्यावरच आवेदनपत्रे भरावीत



 पुणे दि.8 : शिष्यवृत्ती परीक्षेकरीता ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता परिषदेकडून अद्याप कोणतीही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. परिषदेकडून नोव्हेंबर -२०१६ च्या मध्यावर शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधिची अधिसूचना परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे, त्याचे वाचन करुन त्यानुसारच पुढील कार्यवाही करण्याची सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
            पत्रकात म्हटले आहे, शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५वी मध्ये इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८वी मध्ये आयोजित करण्याचे निश्चित केल्यानुसार सन २०१६-१७ मध्ये पूर्व उच्च प्राथामिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये घेण्यात येणार असल्याची शिष्यवृत्ती परीक्षेकरीता ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता परिषदेकडून अद्याप कोणतीही लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. परिषदेच्या असे निदर्शनास आले आहे की, काही खाजगी संस्थांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची आवेदनपत्रे भरुन शुल्क आकारणी केली जात आहेत. परंतु परिषदेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. परिषदेकडून नोव्हेंबर -२०१६ च्या मध्यावर शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१६-१७ ची अधिसूचना परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune.in) प्रसिध्द करण्यात येईल. सदर अधिसूचनेत परीक्षेसंबंधीच्या सर्व सविस्तर सूचना देण्यात येतील. त्याचे वाचन करुन त्यानुसारच पुढील कार्यवाही करावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
0000





No comments:

Post a Comment