Sunday, November 13, 2016

ऊस प्रात्यक्षिक क्षेत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाहणी





पुणे दि. 13 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाची तपशीलवार माहिती घेवून चर्चा केली. त्यांच्यासोबत राज्यपाल सीविद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार उपस्थित होते
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन2025 शुगर या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात करण्यात आले होतेया परिषदेच्या उदघाटनानिमित्त पंतप्रधान श्रीमोदी यांचे आज या परिसरात आगमन झाले.त्या प्रसंगी त्यांनी या परिसरातील नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिक ऊस क्षेत्राची पाहणी केली
ऊसाच्या लागवडीतील नवीन तंत्रज्ञानाविषयीनवीन बियाण्यांविषयीखतांविषयी पंतप्रधान श्री मोदी यांनी माहीती घेत अत्यंत बारकाईने सर्व प्लॉटची पाहणी केलीऊस पीकाच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी श्रीमोदी यांनी संस्थेच्या संशोधकांकडून माहिती घेतलीयावेळी त्याच्या सोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख उपस्थित होते.
या परिषदेच्या निमित्त या परिसरात लावण्यात आलेल्या ऊस प्रात्यक्षिक क्षेत्रामुळे हा सर्व परिसर हिरवागार दिसत होता.
****

No comments:

Post a Comment