Tuesday, November 8, 2016

साखर नियतन मंजुर


सोलापूर दि. 8:-   जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी सुमारे 6920 क्विंटल इतकी एस-30 दर्जाची  साखर नोव्हेंबर महिन्याकरिता मंजुर झाली आहे.
ही साखर प्रती व्यक्ती 500 ग्रॅम या परिमाणानुसार प्रतिकिलो 13.50 रूपये एवढ्या दराने शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत साखर गोदामामध्ये शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी तसेच हे वाटप नोव्हेंबर महिन्यातच करण्यात यावे असे निर्देश जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहेत.
                                                            00000


No comments:

Post a Comment