Tuesday, November 22, 2016

बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार -जिल्हाधिकारी रणजितकुमार

                                                                
सोलापूर दि.22:- वैद्यकीय पदवीच्या आधारे व्यवसाय करणा-या डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार  नाही परंतु जिल्हयातील बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिला
  बोगस डॉक्टरांवर कारवाई  तसेच सुरक्षित मातृत्व अभियानाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 ते पुढे म्हणाले, पोलीस विभागाने अशा बोगस डॉक्टरांवर थेट गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या वैद्कीय प्रमाणपत्रांची तपासणी करावी. असे निर्देश दिले. तसेच सुरक्षित मातृत्व संदर्भात आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचे योगदान घ्यावे. जिल्हयातील बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन ही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
सध्या जिल्हयात 49 बोगस डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली. या बैठकीसाठी पोलीस उप-अधिक्षक दिलीप चौगुले मनपा आरोग्य अधिकारी डॉ जयंती आडके, डॉ. अविनाश पाटील, डॉ.धडके, अन्य औषध निरिक्षक रोहित राठोड, डॉ.किरण सारडा, डॉ.मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
                                       0 0 0

No comments:

Post a Comment