Wednesday, November 16, 2016

शिवाजीनगर येथे रविवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन


पुणे.दि.16 :पुणे पोलीस आयुक्तालय व जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रपुणे यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार दि. 20 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस ग्राऊंडवर करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता सहाय्यक संचालक गंसांगडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.   
           पत्रकात म्हटले आहेया रोजगार मेळव्यात जिल्ह्यातील पुणे शहरभेसरी व चाकण या औद्येागिक परिसरातील 31 उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहेत्यांच्याकडून एकूध्स 3 हजार 406 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेतजिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पाल्य व इतर उमेदवारांसाठी किमान 10 वी, 12वीपदवीधरआयटीआयडिप्लोमाबीईबीबीएड्रायव्हर्स इ.पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना रविवार,दिनांक20नोव्हेंबर 2016 रोजीच्या मेळाव्यांतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (walk-in-lnterview) उपस्थित राहुन,या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.    
   सहभाग घेणऱ्या सर्व उमेदवारांनी www.maharoigar.gov.in या वेबसाईटवर जाऊन उदयोजकांची मागणी पाहुन आपली ऑनलाईन संमती नोंदवावीया बाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 020-26133606 वर श्री.तु.गं.डगळेकौ.वि.रो..उ मार्गदर्शन अधिकारी किंवा वि.शांदळवी यांच्याशी संपर्क साधावा. महिलांसाठी ॲडविक हाय-टेक प्रा.लि.खराबवाडीचाकण,ॲम्फेनॉल इंटरकनेक्ट इंडिया प्रा.लि.भोसरी इंडस्ट्रीयल एरिया,पुणे-26  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस लिमिटेडसह्याद्री पार्कहिंजेवडी पुणे -411057 या उद्योजकांनी महिलांसाठी जागा असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.                
0000

No comments:

Post a Comment