Thursday, November 17, 2016

जिल्ह्यासाठी साखरेचे नियतन मंजूर


सोलापूर दि.17 : - डिसेंबर महिन्याकरीता संपूर्ण जिल्हयासाठी (शहरी भाग वगळून) सुमारे 5706 क्विंटल इतकी एस-30 दर्जाची साखर मंजूर झाली आहे.
        कोणत्याही परिस्थितीत गोदामामध्ये साखर शिल्लक राहणार नाही तसेच अपात्र ,बनावट शिधापत्रिकाधारकांना त्याचबरोबर एकाच शिधापत्रिकेवर दुबार किंवा त्यापेक्षा जादा वेळा साखर दिली जाणार नाही. साखरेचा अपहार किंवा गैरमार्गाने विल्हेवाट लावली जाणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे  यांनी संबंधितांना दिल्या आहेत. 
        सदरील संपूर्ण साखर दारिद्रय रेषेखालील पिवळया शिधापत्रिका धारकांना डिसेंबर महिन्यातच वाटप करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी पत्रकान्वये दिले आहेत.
                                                                       0 0 0 0

No comments:

Post a Comment