Tuesday, November 29, 2016

डिजीटल कॅशलेस व्यवहारास प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी रणजीत कुमार


सोलापूर दि. 29 : सर्व प्रकाराचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने डिजीटल कॅशलेस व्यवहारास प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी केले. 
            जनतेने डिजीटल कॅशलेस पेमेंट संदर्भात नीति आयोगामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कॉन्फरन्ससाठी जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्यासह, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर उपस्थित होते. संपूर्ण देशात यापुढे कॅशलेस व्यवहारास प्राधान्य देण्यात आले असल्याचे नीति आयोगामार्फत सांगण्यात आले. 
            जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र, ग्रामपंचायती, शासकीय कार्यालयांनी डिजीटल कॅशलेस पेमेंट करावे. तसेच छोटे-मोठे व्यापारी यांनी पॉस मशीन कार्यान्वित करुन कॅशलेस व्यवहार करावेत. पॉस (POS) मशीनची मागणी  बँकेकडे नोंदवावी. तसेच  जनतेने  आर्थिक व्यवहारासाठी डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, प्रिपेड कार्ड, मोबाईल बँकिंग, आधार कार्ड पेमेंट सिस्टिम, युपीआय, वॅलेट सिस्टिमचा वापर करावा. 
            जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार होण्यासाठी लवकरच बँका तसेच ट्रेडर्स यांची बैठक घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी यावेळी सांगितले.
0000000

No comments:

Post a Comment