Thursday, November 10, 2016

पेट्रोल, डिझेल, गॅस व औषधी खरेदीसाठी अस्तित्वात असलेल्या 500 व 1000 च्या जून्या नोटा 11 नोव्हेंबरपर्यत स्विकारण्यात येणार


          पुणे दि.9: भारत सरकारच्या राजपत्र भाग खंड 3 उपखंड (ii) दिनांक 8 नोव्हेंबर, 2016 अनुसार पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनी नोटा 9 नोव्हेंबर, 2016 पासून चलनातून बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हा पेट्रोल डिलर असोसिएशन, हिंदुस्थान पेट्रोलीयम कार्पोरेशन, भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन व इंडियन ऑईल कार्पोरेशनचे अधिकारी व गॅस संघटनेचे पदधिकारी, शासकिय रुग्णालयाचे अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, अशासकिय वै्द्यकिय संघटना, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन (औषध व द्रव्ये), सहधर्मादाय आयुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.
     सरकारी रुग्णालयातील औषधी दुकाने तसेच धर्मादाय रुग्णालये, खाजगी औषधी दुकाने याठिकाणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनसह पाचशे व एक हजार रुपयांच्या जून्या नोटा स्विकारण्यात येणार आहेत. सदरची सवलत मानवतावादी दृष्टिकोनातून 72 तास म्हणजेच 11 नोव्हेंबर, 2016 च्या रात्री 12 वाजेपर्यत चालु राहणार आहे. रुग्णाच्या कुटुंबियांच्या सोईसाठी ही सेवा देण्यात येत आहे. रुग्ण व त्याच्या कुटुंबियांनी  रुपये 500 च्याआतील बिल असल्यास बिलाच्या रकमेएवढे पैसे द्यावेत. तसेच 500 रुपयांपेक्षा अधीक बिल असल्यास 500 1000 च्या जुन्या नोटांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.  
     पेट्रोल, डिझेल, गॅस पंप तसेच घरगुती वापराच्या गॅसची एजन्सीच्या सेवा अत्यावश्यक सेवा असल्यामुळे या ठिकाणी नागरीकांना ही 72 तासासाठी म्हणजेच 11 नोव्हेंबर, 2016 चे रात्री 12 वाजेपर्यत रुपये 500 1000 च्या जुन्या नोटा वापरण्याची सवलत देण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की पेट्रोल, डिझेल, गॅस खरेदी करण्यासाठी रुपये 500 च्या आतील बीलासाठी सुटे पैसे द्यावेत. रुपये 500 च्या वरील खरेदीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रुपये 500 1000 च्या जुन्या नोटांचा वापर करावा.
            या व्यातिरिक्त सार्वजनिक बस सेवा, रेल्वे तिकिट बुकिंग, विमान तिकिटासाठी व स्मशानभूमीमध्ये रुपये 500 1000 च्या जुन्या चलनी नोटा 11 नोव्हेंबर,2016 च्या रात्री 12 पर्यत स्विकारण्यात येणार आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस पंप व औषधी दुकाने याठिकाणी खरेदी रक्कम रुपये 500 1000 असल्यास नागारीकांनी तेवढ्याच पूर्ण रकमेचे इंधन भरावे किंवा औषधी खरेदी कराव्यातइंधन अथवा औषधांची रक्कम रुपये 10/-,20/-, 50/- 100/- असल्यास नेमके सुट्टे पैसे द्यावेत. नागरिकांनी 11 नोव्हेंबर, 2016 चे मध्यरात्री 12 वाजेनंतर जुन्या रुपये 500 1000 च्या चलनाद्वारे पेट्रोल, डिझेल, गॅस पंप तसेच औषधी मागणे हे बेकायदेशीर ठरणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.

000

No comments:

Post a Comment