पंढरपूर,दि.4: राष्ट्रीय
कृषि विकास अभियानाच्या योजनेतंर्गत शेततळ्यांना प्लास्टिक शीट अस्तरीकरण या
घटकाचा लाभ मिळवण्यासाठी तालुक्यातील
शेतक-यांनी संबंधीत मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे दिनांक 9 नोव्हेंबर 2016 पर्यंत
अर्ज करावेत असे अवाहन तालुका कृषी अधिकारी एम.यु.कौलगे यांनी केले आहे.
राष्ट्रीय कृषि विकास अभियान सन 2016-17 मध्ये प्राप्त
लक्षांकानुसार तालुक्यातील 38 शेततळ्यांना प्लास्टिक शीट अस्तरीकरण या घटकाचा लाभ
मिळणार असून, यामध्ये खुला प्रवर्ग 19, अनुसूचित जाती-6, अनुसूचित जमाती-2 व
महिलासांठी 11 या प्रवर्गातील लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात
येणार आहे. अधिक माहितीसाठी संबधित शेतक-यांनी
मंडळ कृषि अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे संपर्क साधावा असे अवाहनही तालुका कृषी अधिकारी श्री.कौलगे
यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment