Saturday, November 5, 2016

कार्तिकीमध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी – रणजीत कुमार

          पंढरपूर दि.०४:  कार्तिकी यात्रेत सर्व अधिका-यांनी आपआपसात योग्य तो समन्वय ठेवावा तसेच ही यात्रा  निर्विघ्नरीत्या पार पडावी यासाठी संबधीत विभागाने यात्रेत येणा-या  भाविकांची  गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना  जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी दिल्या.
            कार्तिकी यात्रा २०१६ नियोजना संदर्भात येथील शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.बैठकीस  अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण देवरे, प्रांतधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी पुर्नवसन संजय तेली, सहायक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, तहसिलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.माया शेळके, सां.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता एस.टी.राऊत, न.पा.चे मुख्याधिकारी अभिजीत बापट,तालुका पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुध्द व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच वाळवंटातील खड्डे बुजवून वाळवंट व घाटाची स्वच्छता करावी.  वाळवंटाता पुरेशा प्रकाशाची सोय करुन भाविकांसाठी सुचना फलक लावावेत. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नुमूने तपासून घ्यावेत तसेच पुरेसा  औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्याबरोबरच तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी तसेच सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्यात.  ६५ एकर, पत्राशेड, वाळवंट तसेच मंदीर परिसरात अग्निशमन  व्यवस्था  उपलब्ध करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी दिले
          कार्तिक यात्रेत परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. येणा-या भाविकांना भाषेची अडचण येवू नये म्हणुन व्दिभाषीकाची नेमणूक करावी तसेच दर्शनबारी, दर्शन मंडप, वाळवंट, पत्राशेड, ६५ एकर व महत्वाच्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेचे सुचना फलक लावावेत. मंदीर समितीने भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दर्शनबारी,दर्शन मंडपात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात तसेच अतिरिक्त लाडू प्रसाद केंद्राची उपलब्धता करावी. पाटबंधारे विभानाने नदी पात्रात पाणी सोडण्या बाबतचे तात्काळ नियोजन करावे. विद्युत विभागाने यात्रा कालावधीत अखंड विदयुत सुरु ठेवावा व आश्यक ठिकाणी जनरेटरची सोय उपलब्ध करुन देण्याच्या सुचानाही  यावेळी जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी दिल्या.
 या बरोबरच  सार्वजनिक बांधकाम, दूरसंचार, तहसिल, राज्य उत्पादन शुल्क, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, एस.टी. महामंडळ, उत्पादन शुल्क या विभागाचाही बैठीकीत  यांनी आढावा घेऊन यात्रे संबधी सज्ज राहण्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या.
                                                            000000

No comments:

Post a Comment