Saturday, November 19, 2016

मुख्य निवडणूक निरीक्षकपदी दौलत देसाई यांची नियुक्ती



पुणे, दि. 19 (वि.मा.का.) : पुणे जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका निपक्ष, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक निरीक्षक व तीन निवडणूक निरिक्षक यांची नियुक्ती केली आहे.
          पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांची मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी(एसआरए) सुनंदा गायकवाड यांची जून्नर, शिरुर व दौंड या नगरपरिषदांसाठी तर यशदा येथील सहयोगी प्राध्यापक जोत्सना हिरमुखे यांची इंदापूर, बारामती, जेजूरी नगरपरिषदांसाठी तर पुणे मुद्रांक शुल्क सहनियंत्रक नयना बोंदार्डे यांची आळंदी, सासवड, तळेगाव व लोणावळा या नगरपरिषदेच्या निवडणूक निरीक्षकपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणकीचे जिल्हा समन्वयक उत्तम पाटील यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment