Tuesday, November 15, 2016

म्हाडाची ऑनलाईन सोडत दि. 24 नोव्हेंबर रोजी


  पुणे, दि. 15 : म्हाडाच्या पुणे विभागातर्फे 2503 सदनिका व 67 भूखंडांच्या विक्रीच्या ऑनलाईन सोडतीसाठी 31 हजार नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहेसदर सोडत गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता स्वारगेट येथील श्री गणेश कला व क्रीडा रंगमंच येथे आयोजीत करण्यात आल्याची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे
       पत्रकात म्हटले आहे, म्हाडाच्या पुणे विभागातर्फे 2503 सदनिका व 67 भूखंडांच्या विक्रीसाठी दि. 5 सप्टेंबर, 2016 रोजी जाहिरात देण्यात आली होती.  सदर जाहिरातील अनुसरुन अंदाजे 31 हजार नागरिकांनी अनामत रक्कम भरुन सोडतीसाठी सहभाग नोंदवला आहे.  सदर सदनिकांची ऑनलाईन सोडत श्री गणेश कला व क्रीडा रंगमंच, नेहरु स्टेडिअम शेजारी, स्वारगेट, पुणे येथे गुरुवार दि. 24 नोव्हेंबर, 2016 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. ऑनलाईन सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटवर होणार आहे. यशस्वी झालेल्या विजेत्या लाभार्थ्यांची यादी व प्रतिक्षा यादी सोडतीच्या ठिकाणी, म्हाडा पुणे येथील विभागीय कार्यालय व म्हाडाच्या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहे.
         अर्जदार सेाडतीच्या वेळी उपस्थित राहिले तर त्यांना संगणकीय सोडतीची संपूर्ण प्रक्रिया अनुभवता येईल व विजेत्यांच्या यादीमध्ये नाव असल्यास स्क्रीनवर देखील पाहता येईल,अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे. तसेच या वेबसाईट देखील पाहता येईल.puneboardmhada@yahoo.in,
                 

No comments:

Post a Comment