Sunday, November 13, 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीकडे प्रयाण


पुणे, दि. 13 (वि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानाने लोहगाव विमानतळावरुन सायंकाळी 7.55 वाजता दिल्ली कडे प्रयाण झाले.
 श्री. मोदी यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  तसेच केंद्रीय मानव संशोधन व विकासमंत्री प्रकाश जावडेकर,  पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे, अनिल शिरोळे, अमर साबळे, लष्कराचे मेजर जनरल मनोज ओक, एअर कमांडर ए. के. भारती, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम,पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव हेही यावेळी उपस्थित होते.
००००



No comments:

Post a Comment