Tuesday, November 29, 2016

शून्य ते पाच वयोगटातील दिव्यांगासाठी लवकर निदान त्वरीत उपचार उपक्रम - अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील


सोलापूर दि. 29 :    शून्य ते पाच वयोगटातील दिव्यांग मुलाना त्वरीत उपचार मिळाळेत, त्यांच्यातील दिव्यांगाचे लवकर निदान व्हावे यासाठी अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत लवकर निदान त्वरीत उपचार हा उपक्रम राबविण्यात येणार येत असल्याची माहिती अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी आज दिली. 
            अपंग कल्याण आयुक्तलयामार्फत्‍ राबविण्यात येणार या उपक्रमाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून करण्यात येत असून या उपक्रमास व्यापक प्रमाणात प्रसिद्धी मिळावी अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली.  या उपक्रमाबाबत माहिती देतांना श्री. पाटील म्हणाले,दिव्यांग असलेल्या मुलास त्वरीत उपचार मिळणे गरजचे आहे. त्याला त्वरीत व वेळेत उपचार  मिळाल्यास तो बरा होऊ शकतो.  त्वरीत उपचाराबाबरोबरच आपले मुल दिव्यांग आहे हा  त्याच्या आई-वडिलामध्ये असणारा न्यूनगंड कमी करणेही महत्वाचे आहे. तसेच दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात लोकांचा सहभाग वाढणे महत्वाचे आहे.
            दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव शासनास लवकरात लवकर पाठविण्यात येणार आहे.  शासनाबरोबरच उद्योजकांनी त्यांच्या सीएसआर फंडामधूनही या उपक्रमास हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

000000

No comments:

Post a Comment