Thursday, November 17, 2016

स्पर्धा परिक्षापूर्व प्रशिक्षण सत्रात सहभागासाठी अदिवासी उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन




पुणे. दि.17:- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागामार्फत मंचर येथे अदिवासी उमेदवारांकरिता चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात दि. 1 डिसेंबर 2016 पासून स्पर्धा परिक्षापूर्व मार्गदर्शन प्रशिक्षण सत्र सुरु होत आहे. या प्रशिक्षण सत्रात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी गुरूवार दि. 24 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने मुलाखतींसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  अधिकारी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
            पत्रकात म्हटले आहे, शासकीय, निमशासकीय कार्यालयात वर्ग 3 या पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत स्पर्धा परिक्षा घेवून उमेदवारांची निवड केली जाते. मंचर येथील प्रशिक्षण केंद्रात आदिवासी उमेदवारांना साडेतीन महिने कालावधीचे स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण हे पूर्ण वेळ असून या प्रशिक्षणात गणित, इंग्रजी, लिपीक योग्यता, बौध्दिक चाचणी व सामान्यज्ञान हे विषय शिकविले जातात. उमेदवारांना संगणक हाताळणीचे ज्ञान मिळावे म्हणून केंद्रात संगणक लॅब सुर करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना 1000 विद्यावेतन देण्यात येते. या प्रशिक्षण सत्रात भाग घेण्यासाठी  उमेदवारांची शैक्षणिक पात्रता एस.एस.सी उत्तीर्ण व वय 18 ते 30 वर्ष असावे. पात्र उमेदवारांनी जातीच्या दाखल्यासह दि. 24 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, बद्रुनिस्सा मंझील, घोडेगाव रोड, मंचर ता. आंबेगाव येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन  पत्रकात करण्यात आले आहे

*******

No comments:

Post a Comment