Saturday, November 19, 2016

पुणे शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी


            पुणे, दि.19:पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त सुनिल रामानंद यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 19 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2016 पर्यंत रात्रौ 12 वाजेपर्यंत  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी  केला आहे.
            यानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे, कोणत्याही इसमाचे, चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांचे चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नितिमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे वर्तन करणे यास मनाई करण्यात येत आहे. तसेच मोठ्याने घोषणा देणे, मिरवणूक काढणेभाषण करणे, अविर्भाव करणे, सभा घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक इसमांचा जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
            जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.  तसेच हा आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.


****

No comments:

Post a Comment