Friday, November 11, 2016

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
        विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न

            पंढरपूर दि. 11 : कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. शासकीय महापुजेस उपस्थित राहण्याचा मान श्री. विलास लहू शेलवले (वय 52 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी सौ. वनिता विलास शेलवले  (वय 46 वर्षे) मु. पो. पिंजाळ, ता. वाडा, पालघर  या वारकरी दांपंत्यास मिळाला.
            शासकीय महापुजेनंतर मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर मंदिर समितीच्यावतीने जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
            शासकीय महापुजेस जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे सभापती रणजीतकुमार, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण देवरे, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, तहसिलदार नागेश पाटील, सहायक पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन,माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.
            शासकीय महापुजेपूर्वी मंदिर समितीच्यावतीने पहाटे 1.15 वाजता अप्पर जिल्हाधिकारी प्रविण देवरे  यांच्या हस्ते  सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची पुजा करण्यात आली.
00000

No comments:

Post a Comment