पुणे, दि. 23 (वि.मा.का.) आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उपलब्ध जलस्त्रोतांचा पुरेपुर वापरकेल्यास राज्याच्या मत्स्योत्पादनात निश्चित वाढ होईल. यासाठी चांगले मत्स्यशेतकरीघडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयशिखरे यांनी आज निरा येथे केले.
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनाच्या निमित्ताने निरा, ता.पुरंदर येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापनयंत्रणा (आत्मा), पुणे पुरस्कृत "आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गोडया पाण्यातील मत्स्यशेती " याविषयावर मत्स्यव्यवसाय विभागातर्फे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यातआली. यावेळी श्री. शिखरे बोलत होते.
कार्यक्रमास पुण्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, जनक भोसले,निओस्पार्क, गुजरातचे राहुल राठोड, चेतन साळुंखे, पुणे, ग्रोवेल फीड्सचे श्री. सावते, इंडोझेनचेराजेश गाढवे, गरवारे वॉलरोपस् च्या जिया भट, मृण्मयी एंटरप्रायझेसचे राजेंद्र कांदळगावकरआदींनी मार्गदर्शन केले.
यावेळी मत्स्यशेतीचे आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन, शेततळयातील मत्स्यशेती,वेन्नामी कोळंबीची शेती, केज कल्चर, मत्स्यशेतीमध्ये मत्स्यखादय, खते व औषधांचे महत्व वगिफट तिलापिया माशाच्या संवर्धनाबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळीगिफ्ट तिलापिया माशाच्या संवर्धनाबाबत व पाण्याच्या घटकांच्या तपासणीबाबत प्रत्यक्षमत्स्यतळयावर निरा येथील प्रगतशील मत्स्यशेतकरी पंडीत चव्हाण यांनी प्रात्यक्षिकांसह सविस्तरमार्गदर्शन केले.
उत्कृष्ट मत्स्यशेतकरी निर्माण करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातर्फे सर्वतोपरीसहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन विजय शिखरे यांनी दिले. प्रशिक्षण कार्यशाळेस 125प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.
00000
No comments:
Post a Comment