Tuesday, November 22, 2016

जिल्हयातील 214 शेतक-यांना शेततळयांचा लाभ

              
सोलापूर दि.22:-राष्ट्रीय फलोत्पादन अथियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्हयातील शेतक-यांकरीता सामुहिक शेततळयांसाठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या योजनेकरीता सुमारे 2667 इतके तालुकानिहाय अर्ज प्राप्त झाले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात महसूल उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांच्या उपस्थितीत या योजनेची  लाभार्थी निवड सोडत काढण्यात आली. यामध्ये 214 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला.त्यामध्ये खुल्या वर्गातील 95, अनुसूचीत जातीतील 34, जमातीतील 21 तर एकूण 64 लाभार्थी महिलांचा यात समावेश आहे.
    राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जिल्हयातील 11 तालुक्यांसाठी 111 तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 103 इतक्या शेततळयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. लाभार्थी शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले. याप्रसंगी कृषी उपसंचालक मनोहर मुंढे यांच्यासह संबंधित लाभार्थी उपस्थित होते.
                                                                  0 0 0 0 

No comments:

Post a Comment