Monday, November 21, 2016

जिल्ह्यातील प्राचार्यांना आवाहन

                                                                                                
सोलापूर दि.21:- जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ,वरिष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयाच्या सर्व प्राचार्यांनी सन 2015-16 या वर्षातील महाविद्यालयाच्या लॉगिन मध्ये अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व मॅट्रीकोत्तर शिक्षण फी चे प्रलंबित अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या लॉगिन मध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत भरुन या कार्यालयाच्या लॉगिन मध्ये पाठवावेत. 
दि. 30 नोव्हेंबर 16 पर्यंत ज्या महाविद्यालयाचे अर्ज येणार नाही. त्या महाविद्यालयाचे अर्ज आयुक्तालयाकडून, महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज ऑनलाईन काढून टाकण्यात येतील व संबंधित प्राचार्य याबाबीस जबाबदार राहतील. अशी माहिती  एन. आर. चौगुले सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.  
000

No comments:

Post a Comment