Saturday, November 5, 2016

65 एकर, वाळवंट व पत्राशेड परिसराची जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्याकडून पाहणी ­­


          पंढरपूर दि.०४:-   कार्तिक वारीसाठी येणाऱ्या भाविकांची 65 एकर येथे  राहण्याची सुविधा करण्यात आली असून या सुविधेची, तेथील सुरु असलेल्या कामांची, वाळवंट, पत्राशेड परिसराची जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी पाहणी केली.
            यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण देवरे, प्रांतधिकारी विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी पुर्नवसन संजय तेली,  सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, तहसिलदार नागेश पाटील,  शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी  रणजीत कुमार यांनी 65 एकर परिसरात सुरु असलेल्या कामांची पाहणी करुन त्याबाबत सर्व सबंतित अधिका-यांना सूचना दिल्या. तद्नंतर त्यांनी वाळवंट व नदीपात्राची पाहणी केली. वाळवंट  आणि नदीपात्रात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.  महाद्वार रस्ता हा भाविकांसाठी खुला रहावा. या रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, जे दुकानदार अशी अतिक्रमणे  करतील ती नगरपालिकेने तात्काळ काढावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
            वाळवंट, 65 एकर, पत्राशेड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मदत कक्षातील  अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी.  अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
                                                        
                                                               ०००००

No comments:

Post a Comment