Wednesday, November 16, 2016

विधानपरिषद निवडणूकीसाठी आचारसंहितेचे पालन करुन निवडणूकीचे पावित्र्य राखावे - जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणेदि.16:- विधानपरिषद (स्थानिक प्राधिकारी संघ) निवडणूक निर्भय मुक्त वातारवणात पार पाडली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या  आदर्श आचारसंहितेचे पालन करुन अधिक पारदर्शकता आणून निवडणूकीची पवित्रता राखली गेली पाहिजे. यासाठी संबधितानी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानपरिषद निवडणूकीबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, संबधित उमेदवार व त्यांच्या पक्षातर्फे केले जाणारे रोख रक्कमाचा मोठा आर्थिक व्यवहारावर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयकर,विक्रीकर आदि संबधित विभागांनी विशेष लक्ष ठेवावे. निवडणूकीत गैरव्यवहार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन अधिक पारदर्शकपणे काम करुन निवडणूक यंत्रणेची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
निवडणूकीच्या दरम्यान नियमबाहय होर्डिग्ज,बॅनरद्वारे राजकीय स्वरुपाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. बँकामार्फत होणाऱ्या मोठया संशयास्पद आर्थिक व्यवहाराबाबत सतर्क रहावे. पैशाचा दुरपयोग निवडणूकीत होवू नये. विविध बँकेमार्फत नोटाची माहिती रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार करावी. तसेच त्याचा अहवालही नियमित कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
निवडणूक कालावधीत सोने व्यापारी यांच्याकडूनही गैरव्यवहार होवू नये अशा सूचना सराफ असोशिएनच्या पदाधिकारी यांना दिल्या. तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीसाठी नियुक्त केलेले भरारी पथके, दक्षता पथके यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती समिक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. दिवाकर देशमुख, जिल्हा उपनिबंधक बी.टी.लावंड (शहर) देवेंद्र कटके (ग्रामीण) आयकर विक्रीकर – राज्य उत्पादन शुल्क पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे अधिकारी,ज्वेलर्स असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment