Monday, November 28, 2016

कौशल्य विकासाची जोड दिल्यास लोकसंख्या देशावरील भार न राहता आधार होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






पुणे,दि28 (वि.मा.का): लोकसंख्या मानवसंसाधनात परावर्तीत झाल्यास राष्ट्राला मोठा आधार होईल. देशातील युवा शक्तीला कौशल्य विकासाची जोड दिल्यास लोकसंख्या ही देशावरील भार न राहता देशाचा भक्कम आधार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
कौशल्य विकास योजनेंतर्गत चिंचवड येथील युवा शक्ती फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेत्यावेळी ते बोलत होतेयावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडेआमदार सर्वश्री लक्ष्मणराव जगतापसंजय भेगडेयुवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष एकनाथ पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात कौशल्य हे आवश्यक असते. समाजात कौशल्याचा आभाव असल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. या बेरोजगार युवकांना कौशल्याची जोड दिल्यास त्यांच्या हाताला  निश्चित काम मिळेल. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य आवश्यक आहे, त्यामुळे प्रत्येकाने कौशल्य धारण करण्याची आवश्यकता आहे. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात केंद्र सरकारने मोठे काम केले आहे, त्याचा दृष्य परिणाम आपल्याला दिसत आहे.
कोणत्याही क्षेत्रात कौशल्य असेल तर रोजगार निश्चितच उपलब्ध असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, युवा शक्ती फाउंडेशनने युवकांसाठी कौशल्यविकासाचे केलेले काम मोठे आहे. या संस्थेचे काम कौतुकास्पद असून युवा शक्ती फाउंडेशनने या क्षेत्रात आणखी काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी युवा शक्ती फाउंडेशनच्या वेबसाईटचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एकनाथ पवार यांनी युवाशक्ती फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. शेवटी आभार सतीश पवार यांनी मानले.
0000000

No comments:

Post a Comment