Thursday, November 10, 2016

शस्त्रपरवानाधारकांनी युआयडी प्राप्त करावा अन्यथा शस्त्रपरवाना रद्द करण्यात येणार


                पुणे.दि.10 : जिल्हृयातील सर्व शस्त्रपरवानाधारकांना आवाहन करण्यात येते की, शस्त्र अधिनियम 1959 नुसार देण्यात आलेल्या सर्व शस्त्रपरवान्याची माहिती शस्त्र नियम 2016 मधील नियम 11 नुसार केंद्र शासनाने तयार केलेल्या एनडीएल या संकेतस्थळावर भरुन त्याबाबतचा युनिक आयडेंटीफिकेशन नंबर प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. सदर डेटाबेसमध्ये शस्त्रपरवानाधारकांना माहिती भरणे अनिवार्य असून त्यामध्ये माहिती न भरल्यास शस्त्रपरवाना अवैध ठविण्यात येणार आहे. तसेच परवान्यावरील शस्त्र जमा करण्यात येणार आहे. 
          जिल्ह्यातील ज्या शस्त्रपरवानाधारकांना जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे व तहसिलदार यांच्याकडून शस्त्रपरवाना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय यांचेकडे  31 मार्च, 2017 पर्यत त्यांच्याकडील शस्त्रपरवान्याची केंद्र शासनाच्या एनडीएल या संकेतस्थळावर  माहिती भरावी व त्याबाबतचा युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयडी) प्राप्त करुन घ्यावा. ज्या परवानाधारकांना उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडून शस्त्रपरवाना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांनी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे 31 मार्च, 2017 पर्यत त्यांच्याकडील शस्त्रपरवान्याची केंद्रशासनाच्या एनडीएल या संकेतस्थळावर माहिती व त्याबाबतचा युनिक आयडेंटीफिकेशन नंबर (युआयडी) प्राप्त करुन घ्यावा. 31 मार्च, 2017 पर्यत जे शस्त्रपरवानाधारक हे त्यांच्या शस्त्रपरवान्याची डेटाएन्ट्री करुन त्याबाबतचा युआयडी नंबर प्राप्त करुन घेणार नाही, अशा सर्व  शस्त्रपरवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात येऊन त्यांच्याकडील शस्त्र संबंधित पोलीस स्टेशनला जमा करण्यात येईल, याची सर्व  शस्त्रपरवानाधारकांनी  नोंद द्यावी असे अपर जिल्हाधिकारी राजेद्र मुठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment