Tuesday, November 8, 2016

वन विभागाच्या वतीने विविध स्पर्धाचे आयोजन


सोलापूर दि. 8:-   पर्यावरण, वृक्ष व जलसंवर्धन या विषयाबाबत शालेय व महाविद्यालयीन युवक - युवती मध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने सामाजिक वनीकरण व वनविभागातर्फे निबंधलेखन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे जिल्हास्तरावर तर राज्यपातळीवर खुल्या  छायाचित्र (फोटोग्राफीस्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे.
 वरील विषयाच्या अनुषंगाने प्राथमिक गट (इयत्ता 4 थी ते 7 वी ) , माध्यमिक गट (इयत्ता 8 वी ते 10 वी ) आणि इयत्ता 11 वी  व त्या पुढील युवक - युवतींसाठी महाविद्यालयीन गट अशा तीन गटांची निर्मिती यासाठी करण्यात आली असून प्राथमिक गटासाठी फक्त चित्रकला स्पर्धा आहे तर  माध्यमिक व महाविद्यालयीन गटासाठी  निबंध , वक्तृत्व व चित्रकला आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धनया विषयावर किमान सहाशे तर मानववन्यप्राणी संघर्ष जबाबदार कोण ?’ या विषयावर हजार शब्दांपर्यत अनुक्रमे माध्यमिक व महाविद्यालयीन गटाने निंबध लिहावयाचा आहे. प्राथमिक गटासाठी  - ‘वन महोत्सवातील माझे वृक्षारोपण , माध्यमिक गटासाठी – ‘जंगलातील निसर्गरम्य दृश्य या विषयावर प्रत्येकी 35 x 28 सें.मी  तर महाविद्यालयीन गटासाठी – ‘आपली संस्कृती व पर्यावरण या विषयावर 56 x25 से.मी इतक्या ड्रॉईंग सीटवर चित्रकला स्पर्धा होणार आहेत.
वक्तृत्व स्पर्धेसाठी आजची जीवनशैली व पर्यावरण हा विषय माध्यमिक तर जागतिक तापमान वाढविकसित व विकसनशिल देशांची भूमिका या विषयांवर महाविद्यालयीन गटासाठी प्रत्येकी  10 मिनिटांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर निसर्गाचे मनोहरी रूप या विषयावर राज्यस्तरीय खुली छायाचित्र स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेत भाग घेवू इच्छिणा-या संबंधित शाळा व महाविद्यालय प्रमुखांनी या स्पर्धेचे आपल्या स्तरावर नियोजन करून प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक उपसंचालक, सामाजिक वनीकरण ( वनविभाग ) विजापूर रोड , सोलापूर या कार्यालयाकडे 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत पाठवावेत . इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे लागवड अधिकारी ( सामाजिक वनीकरण ) अथवा  0217- 2343390 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.       

                                                               00000

No comments:

Post a Comment