Thursday, November 17, 2016

दिव्यांगासाठी पैसे काढण्याची स्वतंत्र व्यवस्था करा : जिल्हाधिकारी


सोलापूर दि.17 : - पैसे काढणे भरणे अथवा कर भरणे यासारख्या बाबींमध्ये अपंग व्यक्तींची ससेहोलपट होवू नये या करीता बँक, पोस्ट ऑफिस,एटीएम सेंटर. न.पा/म.न.पा तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी दिव्यांग व्यकतींकरिता स्वतंत्र रांगेची व्यवस्था संबंधितांतनी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिले आहेत.
                      सध्या देशात 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करणे, बदलून घेण्यासंदर्भा त वर उल्लेख केलेल्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हे निर्देश दिले आहेत.

                                                         0 0 0 0

No comments:

Post a Comment