Tuesday, November 22, 2016

आधुनिक मत्स्यशेतीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

   
 पुणे, दि. 23 (वि.मा.का.) आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उपलब्ध जलस्त्रोतांचा पुरेपुर वापरकेल्यास राज्याच्या मत्स्योत्पादनात निश्चित वाढ होईल. यासाठी चांगले मत्स्यशेतकरीघडविण्याची गरज आहेअसे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयशिखरे यांनी आज निरा येथे केले.               
जागतिक मत्स्यव्यवसाय दिनाच्या निमित्ताने  निराता.पुरंदर येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापनयंत्रणा (आत्मा)पुणे पुरस्कृत "आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गोडया पाण्यातील मत्स्यशेती " याविषयावर मत्स्यव्यवसाय विभागातर्फे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यातआलीयावेळी श्रीशिखरे बोलत होते. 
कार्यक्रमास पुण्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारीजनक भोसले,निओस्पार्कगुजरातचे राहुल राठोडचेतन साळुंखेपुणेग्रोवेल फीड्सचे श्रीसावतेइंडोझेनचेराजेश गाढवेगरवारे वॉलरोपस् च्या जिया भटमृण्मयी एंटरप्रायझेसचे राजेंद्र कांदळगावकरआदींनी  मार्गदर्शन केले.
             यावेळी मत्स्यशेतीचे आधुनिक तंत्रज्ञान  व्यवस्थापनशेततळयातील मत्स्यशेती,वेन्नामी कोळंबीची शेतीकेज कल्चरमत्स्यशेतीमध्ये मत्स्यखादयखते  औषधांचे महत्व गिफट तिलापिया माशाच्या संवर्धनाबाबत तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळीगिफ्ट तिलापिया माशाच्या संवर्धनाबाबत  पाण्याच्या घटकांच्या तपासणीबाबत प्रत्यक्षमत्स्यतळयावर निरा येथील प्रगतशील मत्स्यशेतकरी पंडीत चव्हाण यांनी प्रात्यक्षिकांसह सविस्तरमार्गदर्शन केले.
             उत्कृष्ट मत्स्यशेतकरी निर्माण करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागातर्फे सर्वतोपरीसहकार्य करण्यात येअसे आश्‍वासन विजय शिखरे यांनी दिले. प्रशिक्षण कार्यशाळेस 125प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.
00000

बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार -जिल्हाधिकारी रणजितकुमार

                                                                
सोलापूर दि.22:- वैद्यकीय पदवीच्या आधारे व्यवसाय करणा-या डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार  नाही परंतु जिल्हयातील बोगस डॉक्टरांचा शोध घेवून त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिला
  बोगस डॉक्टरांवर कारवाई  तसेच सुरक्षित मातृत्व अभियानाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 ते पुढे म्हणाले, पोलीस विभागाने अशा बोगस डॉक्टरांवर थेट गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या वैद्कीय प्रमाणपत्रांची तपासणी करावी. असे निर्देश दिले. तसेच सुरक्षित मातृत्व संदर्भात आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचे योगदान घ्यावे. जिल्हयातील बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीने सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन ही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
सध्या जिल्हयात 49 बोगस डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली. या बैठकीसाठी पोलीस उप-अधिक्षक दिलीप चौगुले मनपा आरोग्य अधिकारी डॉ जयंती आडके, डॉ. अविनाश पाटील, डॉ.धडके, अन्य औषध निरिक्षक रोहित राठोड, डॉ.किरण सारडा, डॉ.मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
                                       0 0 0

जिल्हयातील 214 शेतक-यांना शेततळयांचा लाभ

              
सोलापूर दि.22:-राष्ट्रीय फलोत्पादन अथियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्हयातील शेतक-यांकरीता सामुहिक शेततळयांसाठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या योजनेकरीता सुमारे 2667 इतके तालुकानिहाय अर्ज प्राप्त झाले.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात महसूल उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांच्या उपस्थितीत या योजनेची  लाभार्थी निवड सोडत काढण्यात आली. यामध्ये 214 लाभार्थ्यांना याचा लाभ झाला.त्यामध्ये खुल्या वर्गातील 95, अनुसूचीत जातीतील 34, जमातीतील 21 तर एकूण 64 लाभार्थी महिलांचा यात समावेश आहे.
    राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जिल्हयातील 11 तालुक्यांसाठी 111 तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 103 इतक्या शेततळयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. लाभार्थी शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले. याप्रसंगी कृषी उपसंचालक मनोहर मुंढे यांच्यासह संबंधित लाभार्थी उपस्थित होते.
                                                                  0 0 0 0 

पुणे स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणुकीत अनिल भोसले विजयी


पुणे दि22 : पुणे विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रीया आज दि. 22 नोव्हेंबर 2016 रोजी शिवाजीनगर येथील शासकीय गोडाऊनमध्ये शांततेत पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविणारे अनिल शिवाजीराव भोसले यांना निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी विजयी घोषीत केले.   
या निवडणुकीत एकूण झालेल्या 658 मतांपैकी 650 मते वैध तर 8 मते अवैध ठरली. या निवडणुकीत अनिल शिवाजीराव भोसले यांना 440 मते, अशोक येनपूरे यांना 133 मते, संजय चंदूकाका जगताप यांना 71 मते, यशराज पारखी  व विलास विठोबा लांडे यांना प्रत्येकी 3 मते मिळाली.  
शिवाजीनगर गोडाऊनमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रीयेला सुरुवात झाली. 6 टेबलवर मतमोजणी प्रक्रीया पार पडली. यावेळी या मतदार संघाचे निवडणुक निरीक्षक शिवाजीराव दौंड, उपजिल्हा निवडणुक अधिकारी समीक्षा चंद्राकार, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते. 


Monday, November 21, 2016

नगरपालिका निवडणूक निर्भय वातरणात पार पडल्या पाहिजेत --- जिल्हाधिकारी सौरभ राव

 
पुणे, दि. 21 : जिल्हयातील नगरपालिका निवडणूका नि :पक्षपाती,  निर्भय वातारणात पार पडल्या पाहिजेत. लोकसभा विधानसभा निवडणूकीप्रमाणेच सुक्ष्मनियोजन करावे. निवडणूकीत कोठेही गैरप्रकार होवू नये यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नगरपरिषद निवडणूकीत आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक जय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले की, या निवडणूकीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून नियमितपणे आढावा घेतला जात आहे. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. निवडणूकीत कोठेही गैरप्रकार होवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करुन वेळीच करण्यात याबाबतचा अहवाल नियमितपणे पाठविण्यात यावा. गुन्हेगारावर वचक राहिला पाहिजे. मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी देण्यात येणाऱ्या वस्तू, मद्य इत्यादी वाटपावर अंकुश ठेवावा. हातभट्टी विरुध्द कार्यवाही करावी. तसेच या कालावधीत नगरपालिका भागातील दुकानाची मागील वर्षाची विक्री व यावर्षीची विक्री याची पडताळणी करुन अहवाल देण्यात यावा. याद्वारे प्रभावीपणे नियोजन करुन निवडणूकीत प्रशासनाचा प्रभाव दिसून आला पाहिजे यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना संबधितअधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूक कालावधीत भरारी पथक,दक्षता पथक, ‍स्थिर पथक नगरपरिषद स्तरावर प्रभावीपणे कार्यरत असले पाहिजे. संबधित पथकांच्या प्रमुखांची स्वतंत्र बैठक घेवून काम करावे. का य करु नये याबाबत मार्गदर्शन केले जावे. अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या रोख रक्कमाचा मोठा व्यवहार तसेच बँकेमार्फत होणाऱ्या मोठया संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूकीत पेड न्यूज,सोशल मिडिया व इंटरनेट इत्यादी विशेष लक्ष द्यावे. अतिशय प्रभावी कमी खर्चाच्या या माध्यमाद्वारे चुकीचे काही होवू नये. यामधीलअद्यावत तंत्रज्ञान अवगत असलेल्या तज्ञांचा यासाठी सहभाग घ्यावा तसेच या निवडणूकीतही स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी,युवक आदिंचा सहभाग घेवून मतदारामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले.
याबैठकीत राज्य उत्पादन शुल्क,आयकर विक्रीकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

चौकशी अधिकारी म्हणुन जगताप यांची नियुक्ती


सोलापूर दि. 21 : मतीमंद मुलींचे बालगृह, गेंट्याल टॉकिजजवळ येथील मतीमंद मुलगी कु. मानसी हिला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी 15 सप्टेंबर 2016 रोजी दाखल केले तिचे दि.16 सप्टेंबर रोजी निधन झाले. 
तिच्या या मृत्युबद्दल चौकशी अधिकारी म्हणुन उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर क्र. 1 शिवाजी जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत कुणास काही सांगायचे असल्यास संबंधितांनी दि. 24 नोव्हेंबर 16 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय क्र 1 याठिकाणी उपस्थित राहून आपले लेखी अथवा तोंडी म्हणणे सादर करावे असे, आवाहन उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर क्र. 1 या कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000

हयात दाखला सादरीकरणास मुदतवाढ

                                                                                               
सोलापूर दि.21 : - जिल्हयातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांना त्यांचा हयातीचा दाखला सादर करण्यास 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
                    संबंधितांनी बँकेमध्ये हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी करण्याबरोबरच जिल्हा कोषागार कार्यालय किंवा तालुक्यातील उप कोषागार कार्यालयामध्ये उपस्थित राहून  ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
                                                                    0 0 0 0