Tuesday, March 7, 2017

पोलीस शिपाई भरती आवाहन


                       
पुणे, दि. ७ (विमाका): पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागेसाठी आवेदन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे कार्यालयाचे पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय) फत्तेसिंह पाटील यांनी केले आहे.
            सदर पोलीस भरतीसाठी दि. १७ मार्च २०१७ पर्यंत आवेदन अर्ज सादर करावेत. उन्हाळ्याची तीव्रता टाळण्यासाठी प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रिया दि. २० मार्च २०१७ पासून लोहमार्ग पोलीस मुख्यालय, खडकी, पुणे येथील कवायत मैदानावर सुरु करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन अर्ज विहित मुदतीत सादर करावेत. आवेदन अर्ज भरण्याबाबतची अधिक माहिती www.punerailwaypolice.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही श्री. पाटील यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
****


No comments:

Post a Comment