Thursday, April 16, 2020

पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 518 रुग्ण--विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 518 रुग्ण
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरात 120 फ्ल्यू क्लिनिक
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

         पुणे दि.16:- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 518 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 404 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            विभागात आतापर्यंत एकू 518 कोरोना बाधित रुग्ण असून एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 463 बाधीत रुग्ण त्यापैकी 42 रुग्णाना घरी सोडण्यात आले आहेत तसेच 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. तसेच असून 8 ॲक्टीव रुग्ण आहेत. सोलापूर जिल्हयात 12 बाधीत रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 11 ॲक्टीव रुग्ण आहेत. सांगली जिल्हयात 26 रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी 25 रुग्णांला घरी सोडण्यात आले आहे. तसेच असून 1 ॲक्टीव रुग्ण आहेत.  कोल्हापूर जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यत  विभागामध्ये एकुण  6 हजार 781 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 6 हजार 383 चा अहवाल प्राप्त आहे. तर 398 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 5 हजार 846 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 518 नमुन्यांचा अहवाल  पॉजिटिव्ह आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकून 120 फ्ल्यू क्लिनिक स्थापन करण्यात आले असून त्यापैकी पुणे महानगरपालिका क्षेत्रात 73 क्लिनिक आहेत तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 47 क्लिनिक आहेत. नागरिकांनी ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ फ्ल्यू क्लिनिकमध्ये जावून उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.
           आजपर्यंत विभागामधील 35 लाख 59 हजार 992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 36 लाख 54 हजार 248 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 794 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
विभागात एकूण 5 हजार 971 नागरिकांना निरिक्षणाखाली होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 4 हजार 11, सातारा जिल्ह्यात 325, सोलापूर जिल्ह्यात 744, सांगली जिल्ह्यात 888 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 03 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
विभागात एकूण 1 हजार 969 नागरिकांना निरिक्षणाखाली संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 204, सातारा जिल्ह्यात 116, सोलापूर जिल्ह्यात 421, सांगली जिल्ह्यात 62 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1166 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

पुणे येथील मार्केटमध्ये विभागात 32 हजार 675  क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक 7 हजार 33 क्विंटल, फळांची 2 हजार 118 क्विंटल  तसेच कांदा/ बटाट्याची 15 हजार 510 क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात 15 एप्रिल रोजी 99.283 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.786 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.
        विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत 139 व साखर कारखान्यामार्फत 1 हजार 112 असे एकुण 1 हजार251 रिलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण 1 लाख 27 हजार 36 स्थलांतरीत मजूर असून एकुण 1 लाख 99 हजार 295 मजूरांना भोजन देण्यात येत आहे, असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.   (ही माहिती दुपारी 4.30 वाजेपर्यंची आहे.)
0000

No comments:

Post a Comment